top of page

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ।।


माणुसकी हाच धर्म, समाजसेवा हेच कर्म : आम्ही शिवशक्ती


तुझा फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे. फळाची अपेक्षा करू नको. उचित क्षणी तुला नक्कीच फळ मिळेल या भगवत गीतेच्या उक्तीप्रमाणे शिवशक्ती सोशल फौंडेशन शिवाजीनगर ता. कडेगांव हि सामाजिक संस्था कोणत्याही फळाची अपेक्षा न करता गेली ७ वर्षे निस्वार्थी, समाजिक कार्य करीत आहे. माझा निसर्गाने बनविलेल्या नियमांवर पूर्ण विश्वास आहे. निसर्गाचा सर्वात सुंदर, सोनेरी नियम सदासर्वदा देणे हाच आहे. जो समाजाला काही देऊ शकत नाही तो कधीच आनंदी राहू शकत नाही. अशी समाजशील विचारसरणी असणारे युवानायक मा. प्रमोदभाऊ मांडवे यांनी सन २०१३ साली शिवशक्ती सोशल फौंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना करून समाजसेवेची चळवळ सुरु केली. माणुसकी हाच धर्म आणि समाजसेवा हेच कर्म हे ब्रीद अंगीकारून युवक कल्याण, क्रीडा, शिक्षण, शेती व ग्रामविकास, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, कला आणि संस्कृती आणि इतर अनेक क्षेत्रांत उलेखनीय असे सामाजिक कार्य चालू आहे.

शिवशक्तीचा २०००० पेक्षा जास्त लोकांशी विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून थेट संपर्क आहे. तसेच १२०० पेक्षा जास्त लाभार्थींना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे अनमोल कार्य शिवशक्तीच्या माध्यामतून झाले आहे. कृषी आणि ग्रामविकास क्षेत्रात संस्था महत्वपूर्ण कार्य करीत असून संस्थेच्या माध्यामातून विविध शासकीय आणि खाजगी विभागांच्या सहकार्याने रु. २५ लक्ष पेक्षा जास्त किंमतीची खते शेतकऱ्यांना मोफत वाटण्यात आली आहे. शेतकरी सक्षमीकरणासाठी शिवशक्ती फौंडेशनने शेतकऱ्यांना एकत्र करून शिवशक्ती शेतकरी गट स्थापन केला या गटाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा प्रसार-प्रचार आणि अंमलबजावणी केली जात आहे. शिवशक्ती कृषी औजारे बँक या सवलतीत भाडेतत्वावर शेती औजारे सुविधा पुरविण्याचा प्रकल्प संस्थेने यशस्वीरित्या राबविला आहे. शेतकऱ्यांना जे जे पाहिजे ते सर्व पुरविण्याचे कार्य शिवशक्तीच्या माध्यामातून होत आहे.

राष्ट्राची प्रगती करायची असेल तर युवकांना घडविले पाहिजे. यासाठी युवकांना चारित्र्य घडविणारे, मानसिक बल वाढविणारे आणि स्वावलंबी बनविणारे शिक्षण दिले पाहिजे असे स्वामी विवेकांनद यांनी सांगितले होते अगदी त्याचप्रमाणे शिवशक्तीने युवकांना विकासाचा धागा बनवून चांगले शिक्षण, पायाभूत सुविधा, सर्वोत्कृष्ठ मार्गदर्शन आणि सर्वकाही उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. युवाजागृती या प्रकल्पातून विद्यार्थी आणि युवकांना घडविण्याचे कार्य शिवशक्ती करीत आहेत. संस्थेने कै. अधिकभाऊ मांडवे यांच्या नावाने वाचनालयाची स्थापना शिवाजीनगर ता. कडेगाव येथे केली आहे. वा